लोकसभा निवडणूक २०२४! भाजपप्रणित NDA ने गाठलं बहुमत; काँग्रेसचं शतक पूर्ण

04 Jun 2024 10:45:22
 rahul gandhi
 
नवी दिल्ली : मागच्या तीन महिन्यांपासून चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार, दि. ४ जून २०२४ ला जाहीर होत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणूकीतील लढत ही भाजपप्रणित एनडीए आघाडीत आणि काँग्रेसप्रणित इंडी आघाडीत आहे. सुरूवातीच्या कलानुसार दोन्ही आघाडींमध्ये चुरशीची लढत आहे.
 
सुरूवातीच्या कलानुसार, भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. भाजपप्रणित एनडीए आघाडीला २९० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इंडी आघाडीने आतापर्यंत २२२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर इतर उमेदवारांवा ३२ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. सुरुवातीलच्या कलानुसार भाजपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये २०१९ च्या तुलनेत कमी जागा मिळत आहेत.
 
महाराष्ट्राचा ४८ लोकसभा मतदारसंघात १९ जागांवर महायुतीने आघाडी मिळवली आहे. तर २८ जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान पार पडले होते. दि. १६ मार्च २०२४ ला केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक वेळापत्रकाची घोषणा केली होती. निवडणुक घोषणेनंतर संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली होती.
 
लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे, चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे, पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे, सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडलं होते. त्यानंतर आज दि. ४ जून २०२४ ला मतमोजणी होत आहे.
 
महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान झाले होते. महाराष्ट्रातील लढाई ही भाजपप्रणित महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या निकालावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
 
Powered By Sangraha 9.0