लोकसभा निवडणूक २०२४! काश्मीरमध्ये धक्कादायक निकाल; अब्दुल्ला-मुफ्तीचा पराभव

04 Jun 2024 14:10:46
 chief minister
 
श्रीनगर : केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाच जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. कलम ३७० हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे देशभरात जम्मू-काश्मीरच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती त्यांच्या मतदारसंघात मागे पडले आहेत.
 
ओमर अब्दुल्ला बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बारामुल्ला येथील तुरुंगात असलेले अभियंता रशीद एक लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी आपला पराभव स्विकारला आहे. दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या अनंतनाग-राजोरी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आहेत. या जागेवर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मियाँ अल्ताफ आघाडीवर आहेत.
 
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा, अनंतनाग-राजोरी मतदारसंघातून प्रमुख गुज्जर आणि एनसी नेते मियां अल्ताफ अहमद यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. २६,००० पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहे. काश्मीर खोऱ्यातील तिसऱ्या जागेवर - श्रीनगर लोकसभा मतदारसंघात, एनसीचे आगा सय्यद रुहुल्ला मेहदी हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी पीडीपीचे वाहिद पर्रा यांच्यावर ३,३०० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0