गुगलने ' इतक्या ' कर्मचाऱ्यांना दिला नारळ

04 Jun 2024 14:31:34
 
google
 
 
मुंबई: अल्फाबेट कंपनीचा ब्रँड गुगलने अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, गुगल क्लाऊड विभागात ही सर्वाधिक कर्मचारी कपात करण्यात आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, १०० कर्मचारी कपात करण्यात आली आहे. यावर गुगलच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली की, 'आम्ही याआधी शेअर केल्याप्रमाणे, आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांची आणि पुढे महत्त्वाची संधी पूर्ण करण्यासाठी आमचा व्यवसाय विकसित करत आहोत. आम्ही आमच्या व्यवसायासाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची आमची वचनबद्धता कायम ठेवतो आणि आमचे दीर्घकालीन यश सुनिश्चित करतो,' प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे.
 
सुरूवातीला २०२३ गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी काय सुरू केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मोठे टार्गेट दिले असल्याने ते दडपणाखाली होते असे देखील यापूर्वी कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. कंपनीने आपले लक्ष पूर्ण केले नसले तरी मोठा नफा गुगलने कमावले होते. मागच्या महिन्यात गुगलने २०० जणांना नारळ दिला होता.
 
मुख्यतः गुगलच्या नियोजन, गुगल क्लाऊड नेक्स्ट, वार्षिक कार्यक्रम या विभागातील कर्मचाऱ्यांची गच्छंती केली गेली होती.कंपनीचा एक आय विभागातील महसूल मागील वर्षाच्या तुलनेत २७ पटीने वाढला असून ९.५७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. ऑपरेटिंग मिळकतीत मोठी वाढ होत ९०० दशलक्षावर पोहोचले होते.
 
Powered By Sangraha 9.0