अदानी समुहाच्या समभागात ३ लाख कोटींचे नुकसान! ' इतक्या ' टक्क्याने समभागात घसरण

04 Jun 2024 12:34:06

Gautam Adani
 
 
मुंबई: निवडणूकीचा अनपेक्षित कलामुळे अदानी पोर्टस, व अदानी समुहाच्या इतर समभागात घसरण झाली आहे. परिणामी गौतम अदानी यांच्या कंपनीच्या बाजार भांडवलात मोठे नुकसान झाले आहे. बाजारातील या समभागात २० टक्क्यांनी घसरण झाल्याने अदानी समुहातील समभागात ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अंबुजा सिमेंट,अदानी एंटरप्राईज, अदानी एनर्जी सोल्युशन, अदानी ग्रीन, एनडीटीव्ही, अदानी टोटल गॅस या समभागात १२ ते १८ टक्क्यांनी नुकसान झाले आहे.
 
काल अदानी समुह, रिलायन्स इंडस्ट्रीज व एसबीआय समभागात मोठी वाढ झाली होती. बाजारातील सेन्सेक्स २००० अंशाहून अधि क  बाजारात वाढ झाल्याने मोठी रॅली झाली होती. मात्र आज २० टक्क्यांनी या समभागात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना त्या चा फटका बसला आहे. शेअर बाजारात एनडीए ३५० पर्यंत जागा जिंकण्याची शक्यता निर्माण झाली असताना दुपारपर्यंत कौला त ३०० पर्यंत भाजपा अडकल्याने बाजारात त्याचा परिणाम झाला आहे.
 
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये अदानी समुहाला करोत्तर नफा (Profit After Tax) ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात ३०७६८ कोटींवर पोहोचले आहे. ईबीटीडीआयए ४० टक्क्यांनी वाढत ६६० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
 
Powered By Sangraha 9.0