'दुर्गजिज्ञासा' ग्रंथ महाराष्ट्राच्या नेहमी स्मरणात राहील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

26 Jun 2024 17:06:05
Pradip Patil

मुंबई : नवसंशोधक प्रदीप पाटील यांनी 'दुर्गजिज्ञासा' हा ग्रंथ दि. १८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेट दिला. सातारा जिल्ह्यातील २४ किल्ल्यांचा संदर्भरूपी इतिहास, अचूक नकाशे,अवशेषांचे (Architecture Drawings) असा दस्तावेज असलेला हा ४४४ पानांचा ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ९ वर्षाच्या अथक परिश्रमातून साकारलेला हा ग्रंथ महाराष्ट्राच्या नेहमी स्मरणात राहिल. त्याचबरोबर नवसंशोधनासाठी महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पाटील यांचे कौतुक केले.
 
दरम्यान ग्रंथाचा आवाका पाहून शासकिय दरबारी याची नक्की नोंद घेतली जाईल, असे आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्री शंभूराजे देसाई यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या नवसंशोधकाची भेट मुख्यमंत्र्यांसोबत घडवून आणली.


 Durgjidnyasa

 
'दुर्गजिज्ञासा' या ग्रंथाचे वैशिष्टये
 
- संशोधनात्मक आणि गड-किल्ले संवर्धनास उपयुक्त

- सातारा जिल्ह्यातील २४ किल्ल्यांचा संदर्भरूपी इतिहास, अचूक नकाशे स्थापत्याची रेखाटने

- ऐतिहासिक पत्रे, बखरी, ग्रंथ यांचा याथासार मागोवा घेत गडकोटांना घटनावलीतून जिवंत करणे.

- गडाची आजची अवस्था नेमकी कशी आहे? यासाठी तिथली वास्तूची सप्रमाण मोजमापे घेतलेत.
 
- भविष्यात हीच आरेखने पुरातत्व खाते, शासन, गडप्रेमी इत्यादींना उपयोगी ठरणार.

- इतिहासातला गड नेमका कसा होता याची स्पष्ट कल्पना हा ग्रंथ इतिहासप्रेमींस देईल.



 
Powered By Sangraha 9.0