आज जीएसटी काऊन्सिलची महत्वपूर्ण बैठक निर्मला सीतारामन उपस्थित राहणार

22 Jun 2024 11:38:28

Nirmala Sitharaman
 
मुंबई:आज जीएसटी काऊन्सिलची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नेहमीप्रमाणे ही बैठक होणार आहे. अर्थसंकल्पापूर्व काळात अनेक जीएसटी संबंधित सु़धारित निर्णय या बैठकीत घेतली जाण्याची शक्यता आहे. तज्ञांचे मत अर्थमंत्री लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या संबंधित जीएसटी फ्रेमवर्क मध्ये काय बदल होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
मागील जीएसटी काऊन्सिची बैठक ७ ऑक्टोबर २०२३ ला शेवटची जीएसटी काऊन्सिल (GST Council) ची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी गेमिंग, घोड्यांची शर्यत, कॅसिनो यावर २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला गेला होता. ज्याला गेमिंग कंपन्यांनी नंतर विरोध केला होता. मागील बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, महसूल चिटणीस, सीबीआयसी चेअरमन, सीएम सदस्य, केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली होती.
 
आज जीएसटी काऊन्सिलची ५३ वी बैठक होणार आहे. जीएसटीची सुरूवात झाल्यापासून वेळोवेळी जीएसटी कराची आकारणी व अंमलबजावणीमधील पाहणी व सुधारणा या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीच्या माध्यमातून होत असते. जीएसटी काऊन्सिल बैठकीमुळे आगामी काळातील नवीन कर धोरणे आखली जाणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0