पंतप्रधान मोदींनी जगाला 'योग' मंत्र दिला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

21 Jun 2024 19:04:04
 
Shinde
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माणसाला निरोगी ठेवणारा योग मंत्र जगाला दिला आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी आलेले मुंबईकर नागरिक उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार!
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "योग हे आपल्या देशाचा प्राचीन ठेवा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून माणसाला निरोगी ठेवणारा हा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जगाला दिला आहे. आज जगभरात मोठ्या उत्साहात हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. आज हा दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात गेट वे ऑफ इंडिया येथे साजरा केला जात आहे याचे समाधान वाटत आहे," असे मत त्यांनी व्यक्त केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0