मुंबई : चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईतील सर्वात मोठा 'योगा ऑन स्ट्रीट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ३ हजार योग साधक दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात. दरम्यान शुक्रवार दि. २१ जून २०२४ रोजी चारकोप मार्केट, कांदिवली (पश्चिम) मुंबई येथे सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच या भव्य-दिव्य अशा 'योगा ऑन स्ट्रीट' कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चारकोप कल्चरल अॅण्ड स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी केले आहे.