उशीरा येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर केंद्राची करडी नजर!

17 Jun 2024 18:23:58

सरकारी ऑफिस
 
नवी दिल्ली : कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता चांगलाच फटका बसणार आहे. हा आदेश केंद्रसरकारने काढला असून कार्यालयात उशिरा येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलाच लगाम लावायला सुरुवात झाली आहे. कार्यालयात रोज उशिरा येणाऱ्या कर्मचारी व आधिकाऱ्यांना केंद्र सरकारने वेळ पाळण्याबाबत चांगलीच ताकीद दिली आहे. यामध्ये कार्यालयात उशिरा येऊन लवकर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल देखील सरकारने घेतली आहे.
 
व त्यांच्याकडे देखील गांभिर्याने लक्ष दिले जात आहे. अनेक कर्मचारी हे बायोमेट्रीक हजारी लावत नसल्याचे देखील या सगळ्यातून उघडकीस आले आहे. हे उघडकीस आल्यानंतर सरकारने हे ठोस पाऊल उचलले आहे. सध्याच्या नियमांनुसार रोज उशीरा येण्याबद्दल अर्धा दिवसाची रजा लावावी अशी चूक महिन्यातून दोन वेळा झाल्यास बाकीच्या प्रासंगिक रजा कापल्या जातील.आणि लेट येण्यास ठोस कारण असल्यास सक्षम आधिकारी माफी देऊ शकतात .
 
या नियमांचे कर्मचाऱ्यांने उल्लघन केले तर मात्र शिस्तभंगाची कारवाई देखील त्यांच्यावर होऊ शकते. याचे कारण म्हणजे उशीरा येणे हे एक प्रकारचे गैरवर्तन आहे. असे सरकारचे म्हणणे आहे. म्हणून आता सरकारी कर्मचाऱ्यावर केंद्राची करडी नजर असणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0