मुंबई : 'माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड' अंतर्गत नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे. 'माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड' तरुणांना अॅप्रेंटिसशीपची संधी मिळणार असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. माझगाव डॉक अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या, अंतिम मुदत इ. सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
अॅप्रेंटिसशीप (५१२ जागा)
शैक्षणिक पात्रता -
ग्रुप 'क' - दहावी उत्तीर्ण
ग्रुप 'ख' - आयटीआय उत्तीर्ण
ग्रुप 'ग' - आठवी उत्तीर्ण
ट्रेनिंग कालावधी -
२ वर्षे
वेतनमान -
ग्रुप 'क' - ६ हजार ६०० रुपये
ग्रुप 'ख' - ८ हजार ५० रुपये
ग्रुप 'ग' - ५ हजार रुपये
वयोमर्यादा -
१४ ते २१ वर्षे
अर्ज शुल्क -
१०० रुपये
पदभरतीकरिता अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्वीकारले जातील.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०२ जुलै २०२४ असेल.