मुंबई: Akme Fintrade India Limited (एकमी फिनट्रेड इंडिया लिमिटेड) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ तारखेला बाजारात खुला होणार आहे. हा आयपीओ (IPO) १९ ते २१ जून २०२४ कालावधीत बाजारात उपलब्ध राहणार आहे. एकमी फिनट्रेड इंडिया (Aasaan Loans) आयपीओ बीएसई, एनएसई या दोन्ही एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आयपीओत १.१ कोटींचे समभाग (shares) गुंतवणूकीसाठी आणणार आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे, आयपीओसाठी प्राईज बँड ११४ ते १२० प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. समभागांचा एक गठ्ठा (Lot) १२५ समभागाचा असेल. कमीतकमी १५००० रुपये गुंतवणूकदारांना गुंतवावे लागतील.
Gretex Corporation Services Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना आयपीओतील समभागाचे वाटप २४ जूनपर्यंत करण्यात येणार आहे तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २५ जूनपासून मिळणार आहे. २६ जूनपर्यंत कंपनी एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणार आहे.
कंपनींच्या माहितीनुसार, आयपीओतील एकदा गुंतवणूकीपैकी ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) साठी खुला असणार आहे. तर ३५ टक्के वाटा किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. १५ टक्क्यांपर्यंत वाटा गुंतवणूकीसाठी विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे.
निर्मल कुमार जैन, मंजूदेवी जैन दिपेश जैन, निर्मल कुमार जैन हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. १९९६ साली ही कंपनी स्थापन केली गेली होती. ही कंपनी प्रामुख्याने विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) संस्था आहे. ग्रामीण व शहरी भागात ही कंपनी वित्तीय पुरवठा करते.
अधिकृत आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या महसूलात ( Revenue) मध्ये ३.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात ( Profit After Tax) मध्ये २८३.५ टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीचा महसूल ३१ मार्च २०२३ मधील तिमाहीत,६९.५७ कोटीवरून ३१ डिसेंबर २२०३ मध्ये घसरण होत ५३.४५ कोटींवर पोहोचला आहे तर करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मधील ४.१२ कोटींच्या तुलनेत वाढत ३१ मार्च २०२३ पर्यंत घटत १२.२५ कोटींवर पोहोचला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर भविष्यातील भांडवली तरतूद करण्यासाठी,कंपनीचे विस्तारीकरण करण्यासाठी व काही कंपनीच्या खर्चासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.