नीट परीक्षा प्रकरणात विद्यार्थ्यांना दिलासा! कोर्टात काय घडलं? वाचा सविस्तर...

13 Jun 2024 12:17:36

NEET Exam 
 
नवी दिल्ली : नीट परीक्षा घोटाळा (NEET Exam) प्रकरणात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आता न्यायालयात सुनावणी पार पडली.
 
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द करण्यात आले असून त्या सर्वांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. २३ जून रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत त्यांचे ग्रेस गुण काढून टाकण्याची शक्यता आहे.
 
केंद्र सरकारने पुन्हा परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यनुसार, २३ जून रोजी पुन्हा परीक्षा होईल, त्यानंतर समुपदेशन होईल. तसेच तिसऱ्या याचिकेतील पेपर लीकचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर नाही, असेही एनटीएने सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0