विनीत अभिषेक पश्चिम रेल्वेचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

12 Jun 2024 14:40:21

vinit abhishek
मुंबई, दि.१२: २०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प्रथमच रु. २०२३-२०२४ मध्ये ४००० कोटींचा महसूल प्राप्त झाला.

नागरी सेवांमध्ये रुजू होण्यापूर्वी विनीत यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये औद्योगिक स्पर्धात्मकता, सामाजिक पायाभूत सुविधा, सरकारी सल्लागार, प्रकल्प वित्तपुरवठा आणि सीएसआर यासंबंधीच्या अनेक प्रकल्पांवर सहा वर्षे काम केले होते. त्यांच्या व्यावसायिक व्यस्ततेच्या पलीकडे विनीत अभिषेक हे शाश्वत वाहतूक आणि सार्वजनिक धोरणाच्या मुद्यांवरील उत्तम भाष्यकार आहेत. त्यांचे शोधनिबंध, संपादकीय आणि पुस्तक पुनरावलोकने इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, हिंदुस्तान टाईम्स, द हिंदू इत्यादींमध्ये प्रकाशित झाली आहेत.
Powered By Sangraha 9.0