वाशीनाका येथे जलद्वार बसविण्याची कामे

12 Jun 2024 13:31:24

vashinaka

मुंबई, दि.१२ : प्रतिनिधी 
मुंबई महानगरपालिकेकडून बी. डी. पाटील मार्ग, वाशीनाका येथील गवाणपाडा, एच. पी. सी. एल. रिफायनरी इत्यादी, शेवटच्या भागास पाणीपुरवठ्यामधील दाबामध्ये सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत ७५० मिलीमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्याचे काम गुरुवार, दि. १३ जून रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कारणाने दिनांक १३ जून रोजी सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.


त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

१) एम पूर्व विभाग (बीट क्रमांक १४७ ते १४८) –
लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, भाभा अणु संशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.), वरुण बेवरेजेस (पाणीपुरवठा बंद राहील).


 २) एम पश्चिम विभाग (बीट क्रमांक १५४ ते १५५) –
माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका, मैसूर वसाहत, खाडी मशीन, रामकृष्ण चेंबूरकर (आर. सी.) मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लाल डोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक, चेंबूर छावणी (पाणीपुरवठा बंद राहील).
Powered By Sangraha 9.0