देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदींच्या बायोपिकची घोषणा

12 Jun 2024 13:11:07
 
Kiran Bedi
 
 
मुंबई : भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर लवकरच उलगडणार आहे. ‘बेदी’ असे किरण बेदींच्या बायोपिकचे नाव असून हा चरित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे.
 
देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित ‘बेदी’ या चरित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला किरण बेदी यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा समावेश असेल असे म्हटले आहे.
 
या चरित्रपटाचे दिग्दर्शन कुशल चावला यांनी केले असून त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. ‘ही आहे कुशल चावला लिखित आणि दिग्दर्शित डॉ. किरण बेदी यांच्या जीवनावरील बायोपिक फीचर फिल्मची घोषणा. तुम्हाला मोशन पोस्टर पाहून आनंद होईल अशी आशा आहे. अजून बरंच काही येणार आहे..पाहत राहा!’ असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे.
किरण बेदी या १९७२ साली देशाच्या पहिला महिला आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या होत्या. ३५ वर्षे देशाची सेवा केल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती. त्यावेळी त्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदावर काम करत होत्या.
 

Bedi
Bedi 
 
किरण बेदी यांनी दिल्ली, गोवा, चंदीगड आणि मिझोराम याठिकाणी आयपीएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. अमृतसरमध्ये ९ जून १९४९ रोजी जन्मलेल्या किरण बेदी यांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात अभियान देखील चालवलं होतं. त्यांनी तुरुंगात कैद्यांच्या धूम्रपानावर बंदी घालण्यासोबतच अनेक सामाजिक कामं केली आहेत.
Powered By Sangraha 9.0