जगनमोहन रेड्डींच्या विजयावर लावला ३० कोटीचा सट्टा! पराभव होताच YSRCP च्या नेत्याने केली आत्महत्या

11 Jun 2024 12:32:27
 suicide
 
हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाच्या नेत्याने आत्महत्या केली. वायएसआरसीपी नेते जग्गावर्पू वेणुगोपलारेड्डी यांनी जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाच्या विजयासाठी ३० कोटी रुपयांची पैज लावली होती, परंतु पक्षाच्या दणदणीत पराभवामुळे त्यांनी सर्व पैसे गमावले, त्यानंतर जग्गावर्पू यांनी आत्महत्या केली.
 
वायएसआरसीपीचे नेते जग्गावर्पू वेणुगोपलारेड्डी यांनी हे पाऊल उचलले. पैजेत जिंकलेला पैसा वसूल करण्यासाठी लोकांनी जग्गावर्पूच्या घरावर दगडफेकही केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण आंध्र प्रदेशातील एलुरु जिल्ह्यातील तुर्पुडिगवल्ली गावातील आहे. जेथे ५२ वर्षीय जग्गावर्पू वेणुगोपलारेड्डी यांनी नुझिवेदू मंडल मतदारसंघात वायएसआरसीपीच्या विजयावर पैसा लावला होता.
 
हे वाचलंत का? -  अमृतपाल सिंगच्या सुटकेसाठी अमेरिकेत मोहिम! भारतावर दबाव टाका; खालिस्तान्यांची कमला हॅरिसकडे मागणी
  
त्यांनी अनेक गावांमध्ये पैज लावली होती, पण जगन मोहन रेड्डींचा पक्ष हरला, त्यामुळे त्याच्यावर लोकांची देनदारी वाढली होती. दि. ४ जून २०२४ रोजी मतमोजणी सुरू होती आणि वायएसआरसीपीचा पराभव झाला तेव्हा वेणुगोपलारेड्डी आपल्या गावातून फरार झाले होते. यानंतर, दि. ७ जून रोजी वेणुगोपालरेड्डी यांच्या घरावर कर्जदारांनी हल्ला केला आणि एअर कंडिशनर, सोफा आणि बेडसह त्यांची मालमत्ता लुटली.
 
दुसऱ्या दिवशी ते घरी परतला तेव्हा त्यांना समजले की लोकांनी त्याच्या घराची तोडफोड केली आहे. ते पैशांची मागणी करत होते, त्यानंतर त्यांनी कीटकनाशक पेवून आत्महत्या केली. दि. ४ जून २०२४ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात वायएसआरसीपीने नुझिवेदू मंडल मतदारसंघाची जागा तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) कडून गमावली आहे. वेणुगोपलारेड्डी यांना ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे, काही मीडिया रिपोर्ट्सने ही रक्कम १० कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0