विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक

11 Jun 2024 13:55:18
विधान पदवीधर
मुंबई 
:भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, दि. 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत छाननीनंतर एकूण 88 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीकरिता उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज सोमवार, 10 जून 2024 रोजी करण्यात आली
आहे.
यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघात 10, कोकण विभाग पदवीधर 25, नाशिक विभाग शिक्षक 36 तर मुंबई शिक्षक मतदारसंघात 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, दि. 12 जून 2024 अशी आहे. बुधवार दि. 26 जून 2024 रोजी चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार दि. 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दि. 5 जुलै 2024 रोजी पूर्ण होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0