'आम्हाला १ हजार रुपये द्या'; दिल्लीत महिलांचे सरकारच्या विरोधात आंदोलन!

11 Jun 2024 16:32:08
Delhi Women Protest
 
नवी दिल्ली : दिल्ली की बेटियों का एक सवाल कब मिलेंगे प्रतिमाह रुपये एक हजार, अशी मागणी करत दिल्लीतील गुरु हरकिशन पब्लिक स्कूलसमोर शेकडो महिलांनी आंदोलन सुरु केले. आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी दिल्लीच्या आप सरकारकडे एक हजार रुपयांची मागणी केली. तसेच हातात फलक घेऊन केजरीवाल यांच्याविरोधात नारेबाजी केली.

लोकसभा निवडणुकी दरम्यान आपच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून घेतले होते आणि सगळ्यांना एक हजार रुपये मिळतील, असे सांगितले होते. असा दावा या आंदोलनकर्त्या महिलांनी केलेला आहे. तसेच या महिलांकडून दिल्लीच्या पाणीप्रश्नाबद्दल ही नाराजी व्यक्त करण्यात आली. हे आंदोलन दिल्ली महिला मंचाकडून करण्यात आले होते.

आम आदमी पक्षाने २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना दिल्लीमधील १८ वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिलांना एक हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेला दिल्ली सरकारने महिला सन्मान राशी योजना असे नाव दिले होते. ज्यासाठी आपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन महिलांचे फॉर्म भरून घेतले होते. पंरतु आश्वासन पुर्ण न झाल्याने संतप्त महिलांनी आंदोलन केले. दरम्यान आप नेते नितीन त्यागी यांनी आम्ही असे फॉर्म भरून घेतलेले नाहीत, असे सांगितले. तसेच या योजनेला त्यागी यांनी विरोध केला होता. त्याचबरोबर या योजनेला अद्याप मान्यता मिळालेली नाही.



Powered By Sangraha 9.0