सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई; तस्करीत सापडली इलेक्ट्रिक उपकरणे!

10 Jun 2024 17:55:47
customs-seizes-at-nhava-sheva


 
नवी दिल्ली :     सीमाशुल्क विभागाने न्हावा शेवा येथे मोठी कारवाई करत ४ कोटीचे साहित्य हस्तगत केले आहे. दरम्यान, ४.११ कोटी किमतीचे ४,६०० लॅपटॉप व विविध ब्रँडचे १ हजाराहून अधिक संगणकाचे भाग जप्त केले आहेत. जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस(जेएनसीएच) येथील विशेष गुप्तचर आणि तपास शाखा(एसआयआयबी)च्या अधिकाऱ्यांनी युएई येथून आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.




दरम्यान, सीमाशुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १,५४६ सीपीयू यूएईमधून आयात करण्यात आले तर पुरवठादार हाँगकाँगमध्ये असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, वापरलेले लॅपटॉप मदरबोर्ड केसिंग इ. इनलँड कंटेनर डेपो (ICD) पटपरगंज, दिल्ली करिता तस्करी करण्यात आली. एसआयआयबी अधिकाऱ्यांनी मुंबई आणि दिल्ली येथे एकाच वेळी तपास घेत आयात करणाऱ्या फर्मच्या मास्टरमाइंड कम प्रोप्रायटरला अटक केली आहे.
 
सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी आयातदाराच्या आवारातून २७.३७ लाख रोख रक्कम जप्त केली आहे. कारण तस्करीच्या मालाची विक्री करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विभागाने कारवाईत दिल्ली एअर कार्गो कस्टम्समध्ये त्वरीत तपासात दोन समान शिपमेंट्स उघडकीस आल्या, ज्यात वापरलेले लॅपटॉप होते. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0