रहमानने काढली महिलेची छेड; पोलिसांच्या पाहुणचारानंतर उभं राहणंही झालं अवघड; व्हीडिओ व्हायरल

10 Jun 2024 13:12:59
 Amroha
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव अताउर रहमान असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना शनिवार, दि. ८ जून २०२४ घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करून आवश्यक कारवाई करत आहेत. या घटनेशी संबंधित दोन व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
पहिल्या व्हिडिओमध्ये, अताउर रहमान महिलेकडे चालताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आरोपी पोलिसांच्या खांद्यावर डोलताना दिसत आहे. हे प्रकरण अमरोहा जिल्ह्यातील गजरौला भागातील आहे. येथे शनिवार, दि. ८ जून २०२४ पीडितेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी त्यांची पत्नी पहाटे साडेपाच वाजता दूध आणण्यासाठी जात होती. तेवढ्यात मागून एक अनोळखी व्यक्ती तिथे पोहोचला. त्याने पीडितेला थांबवले. आरोपीने पीडितेसोबत असभ्य वर्तन केले.
 
 हे वाचलंत का? - रियासी दहशतवादी हल्ला! निष्पाप भाविकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी लष्कराची शोध मोहिम
 
पीडितेने विरोध करताच, अताउर रहमानने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने बाजूच्या लोकांना आवाज देताच आरोपी तिला धमकावत पळून गेला. तक्रारदार हे एका कारखान्यात काम करतात. अज्ञात आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवला. या प्रकरणाचा तपास केला असता आरोपीचे नाव अताउर रहमान असल्याचे निष्पन्न झाले. तो गजरौला येथील रहिवासी होता.
  
पोलिसांनी अताउर रहमानला अटक केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन व्हिडिओंपैकी पहिल्यामध्ये आरोपी महिलेकडे वेगाने जाताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये अताउर रहमानला पोलिसांच्या खांद्यावर लटकत पोलिस स्टेशनच्या बाहेर आणले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करून आवश्यक कारवाई करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0