आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात घसरण भारतात दर जैसे थे !

10 Jun 2024 12:11:20

Gold
 
 
मुंबई:आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाल्याने भारतातील काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत घसरण तर काही ठिकाणी सोन्याच्या किंमती जैसे थे राहिल्या आहेत. अमेरिकन बाजारात शुक्रवारी जाहीर झालेली लेबल मार्केट आकडे वारी सकारात्मक दिसली आहे तसेच चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने १८ महिन्यांच्या सोने खरेदीनंतर खरेदीला पूर्णविराम दिल्याचे म्हटले आहे. तसेच यूएस बाजारातील समाधानकारक रोजगार आकडेवारी आल्यानंतर डॉलरच्या किंमतीत वाढ झाली होती. या सगळ्यांचा परिणाम झाल्याने सोने घसरले होते.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात घसरण झाल्याने आशियाई बाजारात देखील त्यावर परिणाम झाला. सोमवारी सकाळी युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.१३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.७५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात सोन्याच्या निर्देशांकात ०.६९ टक्क्यांनी घसरण होत सोने ७०८६४ पातळीवर पोहोचले आहे.
 
'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील सोन्याच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. भारतात २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ६६७०० पातळीवर व २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ७१६७० पातळीवर स्थिरावले आहेत. मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅम दरात कुठलाही बदल न होता ६५७०० पातळीवर कायम राहिले आहेत तर २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम ७१६७० पातळीवर कायम राहिले आहेत. मुंबई व्यतिरिक्त चेन्नईत १० ग्रॅम दर २२ कॅरेटसाठी ६६३० तर २४ कॅरेटसाठी ७२३३ रुपये आहे. दिल्लीत प्रति १० ग्रॅम दर २२ कॅरेटसाठी ६५८५ व २४ कॅरेटसाठी ७१८२ रुपये, कलकत्तात प्रति १० ग्रॅम दर २२ कॅरेटसाठी ६५७० तर २४ कॅरेटसाठी ७१६७ रूपये आहेत.
 
Powered By Sangraha 9.0