भाजपचा विजयोत्सव साजरा केला म्हणून कट्टरपंथीयांचा कार्यकर्त्यांवर हल्ला; चाकू भोसकून जीवे मारण्याच्या प्रयत्न

10 Jun 2024 12:11:20
 Mangaluru
 
बंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरूमधील बोलियारू गावात भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर कट्टरपंथी जमावाने धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हरीश अंचन (४१) आणि नंदकुमार (२४) या दोन भाजप कार्यकर्त्यांना शपथविधी समारंभाच्या संध्याकाळी सुरू असलेल्या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. याचाच राग म्हणून २०-३० जणांच्या कट्टरपंथी जमावाने भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुडिपू गावात आणि जवळच्या बोलियारू गावात भाजपचे कार्यकर्ते केंद्रात सरकार स्थापन झाल्याचा आनंद साजरा करत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याचे निमित्त साधून रॅली काढली होती. मात्र, विजयाचा आनंद साजरा करणारे कार्यकर्ते बोलियार येथील स्थानिक मशिदीसमोरून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा पाठलाग कट्टरपंथी जमावाने सुरू केला.
 
हे वाचलंत का? -  नुपूर शर्मा यांचे २ वर्षानंतर सोशल मीडियावर पुनरागमन; पहिल्याच पोस्टमध्ये म्हणाल्या, "पुन्हा एकदा..."
  
आरोपींनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी हरीश आणि नंदकुमार या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर वार केले. दरम्यान, पीडित व्यक्तींना सध्या राज्यातील डेरलकट्टे भागातील केएस हेगडे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याची प्रकृती चिंताजनक असून इतरांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
  
मंगळुरू भाजप कार्यकर्ते कृष्ण कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत आणि ज्या भागात ही घटना घडली आहे त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सर्व पुरावे गोळा करत आहेत. हिंसाचार आणखी वाढू नये म्हणून मुदिपू गाव आणि बोलियारू गावात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0