मोठी बातमी! उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर
01-Jun-2024
Total Views |
मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पियुष गोयल निवडून येण्याची शक्यता आहे.
पियुष गोयल यांच्याविरोधात मविआकडून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, एक्झिट पोलनुसार भाजप उमेदवार माजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आघाडीवर असून भूषण पाटील पिछाडीवर असल्याचे पोलच्या माध्यमातून समोर आले आहे. पियुष गोयल यांच्या निवडून येण्याची शक्यता बळावली आहे.
भाजपकडून पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी देण्यासंदर्भात जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्याच्या चर्चेपासून त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अंतिमतः भाजपकडून मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.