"पीओकेला भारताचा भाग करण्यासाठी आम्ही वचनबद्ध" - परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

09 May 2024 11:47:27
 jaishankar
 
नवी दिल्ली : "काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग आहे आणि देशातील प्रत्येक राजकीय पक्ष काश्मीरला भारतासोबत जोडण्यासाठी वचनबद्ध आहे. ही आपली राष्ट्रीय बांधिलकी आहे." असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर बुधवार दि. ८ मे २०२४ गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले की लोकांनी हे मान्य केले होते की कलम ३७० रद्द करता येणार नाही, परंतु भाजप सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये ते रद्द केले.
 
जयशंकर म्हणाले की, आज गुलाम काश्मीरचा मुद्दाही देशवासीयांच्या मनात आला आहे. जर ते तुमच्या विचारात आले असेल तर बाकीच्या गोष्टी कधी ना कधी नक्कीच पूर्ण होतील. एस जयशंकर पुढे म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीबाबत राजकीय आणि मानवाधिकार संघटनांनी लाँग मार्च काढला आहे.
  
युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी (यूकीपीएनपी) आणि जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (जेएएसी) यांनी संयुक्त निवेदनात जाहीर केले की गंभीर बेरोजगारी, गहू आणि पिठावरील सबसिडी रद्द करणे, यासह इतर समस्या उपस्थित केल्या जातील. यापूर्वी पाकव्याप्त काश्मीरवर बोलताना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आम्हाला काहीही करण्याची गरज नाही. पीओकेतील लोकं त्यांना कंटाळले आहेत, ते स्वत:च भारतात येऊ इच्छितात.
 
 
Powered By Sangraha 9.0