Q4 Results: टाटा पॉवर तिमाही निकाल कंपनीला ८९५ कोटी निव्वळ नफा

09 May 2024 11:48:55

Tata Power
 
 
मुंबई: टाटा पॉवर कंपनीने आपला चौथा तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी कंपनीला ७७८ कोटींचा निव्वळ नफा झाला होता जो वाढून यंदा ८९५ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २७ टक्क्यांनी वाढ होत हे उत्पन्न १५८४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
 
कंपनीचे एकूण उत्पन्न तिमाहीत १६४६४ कोटींपर्यंत वाढले आहे.मागील वर्षाच्या तिमाहीत १३३२५ कोटी होते. संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा २०२३-२४ मध्ये ४२८० कोटी होता जो मागील वर्षात ३८१० कोटींवर होते. कंपनीच्या माहितीनुसार कंपनीचे बाजार भांडवल १.४ लाख कोटींवर पोहोचले आहे.
 
कंपनीचा ईबीआयटीडीए (EBITDA) मार्च महिन्यात १५ टक्क्यांनी वाढत २३३२ कोटींवर पोहोचला आहे.मागील वर्षी हा २०२८ कोटी होता. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग २ रुपयांचा लाभांश (Dividend) सुचवला आहे. आगामी समभाग धारकांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0