भारतात हिंदूंची लोकसंख्या ८ टक्क्याने घसरली; सरकारी अहवालात धक्कादायक वास्तव उघड

09 May 2024 13:42:38
 hindu
 
नवी दिल्ली : भारतातील मुस्लिम धोक्यात असल्याचा कांगावा काही लोकांकडून केला जातो. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रोपेगंडाला आणखीनच बळ मिळाले आहे. पण वास्तव या उलट आहे. भारताच्या लोकसंख्येमध्ये मुस्लिमांचा वाटा वाढला आहे. तर हिंदूंचा वाटा कमी झाला आहे.
 
एका अभ्यासातून हे वास्तव समोर आले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या साइटवर यासंबंधीची आकडेवारी उपलब्ध आहे. यामध्ये १९५० ते २०१५ दरम्यान भारतातील लोकसंख्येमध्ये झालेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. हा अभ्यास स्पष्ट करतो की, गेल्या ६५ वर्षांत देशाची लोकसंख्या वाढली असली तरी यामध्ये हिंदू धर्मीयांची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे.
  
अहवालानुसार, १९५० ते २०१५ दरम्यान, भारतातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये लक्षणीय ७.८२ टक्के घट झाली आहे. पूर्वी देशात ८४.६८ टक्के हिंदू होते, आता फक्त ७८.०६ टक्के राहिले आहेत. तर याच कालावधीत अल्पसंख्याकांच्या वाट्यामध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. १९५० मध्ये मुस्लिम लोकसंख्येचा वाटा ९.८४ टक्के होता. २०१५ मध्ये तो वाढून १४.०९ टक्के झाला असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. मुस्लिम धर्मीयांबरोबरचं देशातील इतर अल्पसंख्याक मानल्या जाणाऱ्या धर्मीयांच्या लोकसंख्येत देखील वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे भारताच्या शेजारी देशांमध्ये अल्पसंख्याकांची लोकसंख्या झपाट्याने कमी झाली आहे.
 
एकीकडे बांगलादेशची बहुसंख्य लोकसंख्या १९५० मध्ये ७६ टक्के होती, आजही तीच आहे. पण हिंदूंच्या बाबतीत असे नाही. १९५० मध्ये बांगलादेशमध्ये २३ टक्के हिंदू होते आणि आता फक्त ८ टक्के उरले आहेत. पाकिस्तानमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. ६५ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या लोकसंख्येमध्ये हिंदूंचा वाटा १३ टक्के इतका होता तो आता फक्त २ टक्क्यांवर आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0