एअर इंडियाने २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले म्हणाले.....

09 May 2024 11:31:36

Air India
 
 
मुंबई: एअर इंडिया कंपनीने अखेर २५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या 'बेजबाबदार ' वर्तनामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. मंगळवारी व बुधवारी हजारो प्रवाशांना शेकडो विमाने रद्द झाल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. अचानक अनेक कर्मचारी यांनी 'सिक लिव' (आजारी रजा) घेत सामुहिक रजा घेतली होती.
 
कुठलीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांनी ही रजा घेतल्यामुळे एअर इंडियाने अनेक विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. त्याचा मनस्ताप प्रवाशांना झाला. या कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या अटी शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एअर इंडिया कंपनीने ही मोठी कारवाई करत २५ जणांना काढून टाकले आहे.
 
या प्रकारानंतर तब्बल ९५ विमाने रद्दबादल करण्यात आली होती. याबद्दल व्यक्त होताना एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोके सिंह यांना ' शंभरहून अधिक केबिन क्रू सहकाऱ्यांनी त्यांच्या रोस्टर केलेल्या फ्लाइट ड्यूटीपूर्वी, शेवटच्या क्षणी आजारी असल्याची तक्रार नोंदवली, ज्यामुळे आमच्या ऑपरेशनमध्ये गंभीरपणे व्यत्यय आला. कारण ही कृती मुख्यतः L1 भूमिका नियुक्त केलेल्या सहकाऱ्यांनी केली होती, त्यामुळे परिणाम असमान होता, ९० हून अधिक फ्लाइट्स विस्कळीत झाल्या तरीही सहकाऱ्यांनी कर्तव्य बजावले.'
 
मात्र एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने बेजबाबदार कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांचे चांगले आदरातिथ्य केले आहे. त्यानी आपली ड्युटी जबाबदारी व्यवस्थित पार पडल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे. या रद्दबादल झाल्याने विमान उड्डाण वाहतूक मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण मागितले असल्याने व्यवस्थापन याबाबत कर्मचाऱ्यांची चर्चा करणार आहे. डीजीसीए नियमाअंतर्गत मंत्रालयाने कायद्याची पूर्तता करत उद्भवलेला प्रश्न सोडविण्यासाठी सांगितले आहे.
 
Powered By Sangraha 9.0