Q4 Results: लार्सन टयुब्रो कंपनीचा तिमाही निकाल जाहीर! कंपनीला तिमाहीत ४३९६ कोटीचा निव्वळ नफा, महसूलात १५ टक्क्यांनी वाढ

08 May 2024 18:53:43

L&T
 
 
मुंबई: इन्फ्रास्ट्रक्चर जायंट कंपनी म्हणून ओळख असलेल्या लार्सन अँड ट्युब्रो कंपनीने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला या तिमाहीत १०.३ टक्क्यांनी निव्वळ नफ्यात वाढ होऊन एकूण नफा ४३९६ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील हा नफा ३९८७ कोटींवर पोहोचला होता. कंपनीच्या कामकाजातून महसूलात (Revenue From Operations) मध्ये १५ टक्क्यांनी वाढ होत ६७०७८.७ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी हा ५८३३५ कोटी होता.
 
कंपनीच्या निव्वळ एकत्रित करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये १३०५९ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीचा महसूल ६७०७९ कोटीवर पोहोचला आहे ही वाढ इयर बेसिसवर १५ टक्क्यांनी अधिक झालेली आहे.
 
याशिवाय संपूर्ण वर्षात एकत्रितपणे कंपनीचा करोत्तर नफा ६७९.३७ कोटीवर पोहोचला आहे. वर्षभरात महसूलात १६ टक्क्यांनी वाढ झाली असून ४५०१.९२ वरून ५२२६.८९ कोटींवर पोहोचले आहे. कंपनींच्या संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर ८.४० रुपयांचा लाभांश (Dividend) सुचवला आहे याशिवाय १.६५ रुपयांचा विशेष लाभांशदेखील सूचवला आहे याबाबत अंतिम निर्णय आगामी भागभांडवल धारकांच्या बैठकीत होऊ शकतो.
 
Powered By Sangraha 9.0