अखेर परवीन शेखना सोमय्या ट्रस्टचा दणका!

    08-May-2024
Total Views |

Parveen Shaikh

मुंबई (प्रतिनिधी) : सोमय्या विद्याविहार या मुंबईतील प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख (Parveen Shaikh News) यांची हमास समर्थक कट्टर इस्लामिक विचारसरणी उघडकीस आली होती. ऑपइंडियाने सादर केलेल्या एका अहवालातून ही बाब निदर्शनास आली. अखेर सोमय्या ट्रस्टने यासंदर्भात केलेल्या चौकशीनंतर परवीन शेख यांना तत्काळ काढून टाकले आहे. मंगळवार, दि. ०७ मे रोजी ट्रस्टने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे.

दरम्यान, संपूर्ण डाव्या आणि इस्लामिक टोळीने परवीन शेखला वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. एसडीपीआय या इस्लामिक संघटनेनेही परवीन शेख यांना पाठींबा दर्शविला होता. मात्र सोमय्या स्कूलने परवीन शेखला शाळेतून काढून टाकत मोठी कारवाई केली आहे.

सोमय्या स्कूलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमय्या स्कूलमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावत असलेल्या परवीन शेखच्या सोशल मीडिया क्रियाकलाप आमच्या निदर्शनास आणून देण्यात आला. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे निश्चितच समर्थन करतो, परंतु त्यासाठी जबाबदारी आणि इतरांचा आदर देखील आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आम्ही परवीन शेखच्या कारवायांचा तपास केला असून आम्ही तिला तत्काळ पदावरून हटवत आहोत आणि आमचे सर्व संबंध संपवत आहोत.


भारतविरोधी घटकांकडे झुकता मागोवा
'ऑपइंडिया'ने २४ एप्रिल रोजी सादर केलेल्या अहवालात परवीन शेख यांचे इस्लामी विचार आणि सोशल मीडियावरील भारतविरोधी घटकांकडे झुकता मागोवा यासंदर्भात आढावा घेतला होता. त्यांच्या हमास समर्थक विचारांचा शाळेतील मुस्लिम आणि हिंदू मुलांवर सारखाच परिणाम होईल, या विचाराने त्यांचा राजीनामा मागितला होता.

कोण आहेत परवीन शेख?
परवीन शेख या सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. गेली १२ वर्षे त्या शाळेशी निगडीत आहेत. त्यापैकी ७ वर्षे संस्थेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी घालवली आहेत. शेख यांच्याकडे एमएससी आणि एमईड पदव्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ त्या शिक्षण क्षेत्रात आहेत. सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका पदाच्या कार्यकाळात अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.