गुगल पे नंतर आता बाजारात 'गुगल वॉलेट'

08 May 2024 13:05:40

Google wallet
 
 
मुंबई: अँड्रॉइड युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गुगलने आता युजर्ससाठी ' गुगल वॉलेट ' चे अनावरण केले आहे. यामध्ये अनेक सुविधा वापरकर्त्यांना उपलब्ध असणार आहेत.ज्यामध्ये ग्राहक स्टोर कार्ड्स, आपले मासिक पास, चाव्या, आयडी अथवा इतर खाजगी मौल्यवान वस्तू ठेवू शकतात.
 
यामध्ये ग्राहकांना आपले डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सुधा साठवता येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वापरासाठी हे डिजिटल वॉलेट वापरता येणार आहे. गुगल पे पेक्षा हे अँप वेगळे असणार आहे ज्यामध्ये जास्त भर महत्वाची माहिती कागदपत्रे साठवण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि गुगल पे मार्फत आर्थिक व्यवहार करता येतात.
 
याविषयी बोलताना, 'Google Pay कुठेही जात नाही. ते आमचे प्राथमिक पेमेंट ॲप राहील. Google Wallet हे विशेषत: नॉन-पेमेंट वापराच्या प्रकरणांसाठी तयार केले आहे,'असे राम पापटला, जनरल मॅनेजर आणि इंडिया इंजिनियरिंग लीड, गुगल येथे अँड्रॉइड म्हणाले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0