"सोशल मीडियावर गैरसमज पसरवणं हे रोहित पवारांचं एकमेव काम!"

07 May 2024 16:42:57
 
Rohit Pawar
 
पुणे : सोशल मीडियावर गैरसमज पसरवणं हे रोहित पवारांचं एकमेव काम आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. निवडणूकीमध्ये अजित पवार गटाने पैसे वाटले असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावर आता अजितदादांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून पैसे वाटप करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांनी आपल्या 'X' अकाऊंटवर यासंबंधी काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. दरम्यान, अजित पवारांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
हे वाचलंत का? -  दुपारी १ वाजेपर्यंत 'इतकं' मतदान! जाणून घ्या आकडेवारी सविस्तर...
 
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, "रोहित पवारांची सोशल मीडियामध्ये चांगली टीम आहे. तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये जास्त सक्रीय असतो. तो अलीकडच्या पिढीतील असल्याने सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे त्याला चांगलं माहिती आहे. तो इतका पोहोचलेला आहे की, काहीतरी वेगळंही करुन दाखवू शकतो. त्याला सध्या काही उद्योग नसल्यामुळे माझ्याबद्दल वेडवाकडं बोलणं आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरु असतं," असे ते म्हणाले.
 
मंगळवारी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असून यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना सुरु आहे. दरम्यान, एकीकडे मतदानप्रक्रिया सुरु असताना या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0