मुंबई (प्रतिनिधी) : विद्याविहार येथील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख (Parveen Shaikh) या हमास समर्थक विचार आणि सोशल मिडियावरील भारतविरोधी घटकांकडे असलेले आकर्षण या गोष्टींमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यासही सांगितल्याचे समोर आले होते. अशातच आता सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) ने परवीन शेख यांना आपला पाठिंबा दर्शविल्याचे निदर्शनास आले आहे.
एसडीपीआय ही एक कट्टरपंथी इस्लामी संघटना आहे जी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ची राजकीय शाखा तिच्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. एका सोशल मिडिया पोस्टद्वारे एसडीपीआयच्या पुणे युनिटने परवीन शेख यांना आपला पाठींबा दर्शविला आहे. तर ऑपइंडियाच्या अहवालास भारतातील इस्लामोफोबिया म्हटले आहे.
हे वाचलंत का? : वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्डसुद्धा असला पाहिजे! : देवकीनंदन ठाकुर महाराज
'ऑपइंडिया'ने २४ एप्रिल रोजी सादर केलेल्या अहवालात परवीन शेख यांचे इस्लामी विचार आणि सोशल मीडियावरील भारतविरोधी घटकांकडे झुकता मागोवा यासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यांच्या हमास समर्थक विचारांचा शाळेतील मुस्लिम आणि हिंदू मुलांवर सारखाच परिणाम होईल, या विचाराने त्यांचा राजीनामा मागितल्याचे स्पष्ट होत आहे. परवीन शेख यांचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट पाहिल्यास दहशतवादी इस्माईल हनीयेह सारख्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्यांसह इस्रायलविरुद्धच्या त्यांच्या ‘प्रतिकाराला’ समर्थन देणाऱ्या हमासच्या घोषणा असो किंवा इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक आणि दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीचा सूत्रधार उमर खालिद यांसारख्या कट्टरपंथीयांच्या समर्थनार्थ ट्विटल त्यांनी लाईक / रिट्विट केल्याचे दिसेल.
कोण आहेत परवीन शेख?
परवीन शेख या सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. गेली १२ वर्षे त्या शाळेशी निगडीत आहेत. त्यापैकी ७ वर्षे संस्थेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी घालवली आहेत. शेख यांच्याकडे एमएससी आणि एमईड पदव्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ त्या शिक्षण क्षेत्रात आहेत. सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका पदाच्या कार्यकाळात अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.