हर हर महादेवाच्या जयघोषात बाबा केदारनाथच्या पंचमुखी विग्रह मूर्तीचे प्रस्थान

06 May 2024 16:25:45

Baba Kedarnath - RSS Uttarakhand

मुंबई (प्रतिनिधी) :
चार धामांपैकी एक असलेल्या बाबा केदारनाथ (Baba Kedarnath) यांच्या पंचमुखी मूर्तीची देव डोली श्री ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून गुप्तकाशीच्या पहिल्या मुक्कामाकडे सोमवार, दि. ०६ मे रोजी निघाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उखीमठच्या स्वयंसेवकांनी पुष्पवृष्टी व अल्पोपहाराचे वाटप करून यात्रेचे स्वागत केले. यावेळी देव डोली ही फुलांनी सजवण्यात आली होती. श्री ओंकारेश्वर मंदिरात रविवारी सायंकाळी उशिरा श्री भैरवनाथजींची पूजा संपन्न झाली.

हे वाचलंत का? : '...तर राम मंदिराचा निकाल फिरवू'; राहुल गांधींनी वक्तव्य केल्याचा मोठा दावा

उल्लेखनीय आहे की चार धामांपैकी बाबा केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्रीचे दरवाजे १० मे रोजी उघडण्यात येणार आहेत, तर श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे १२ मे रोजी उघडण्यात येतील. चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणीने २१ लाख भाविकांचा आकडा पार केला आहे. उद्घाटनाच्या दिवशी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्याचबरोबर सर्व धाम झेंडूच्या फुलांनी सजवण्यात येत आहेत. उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी दररोज यात्रेच्या तयारीचा आढावा घेत आहेत. चारधाम यात्रा प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

Powered By Sangraha 9.0