कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते! परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक १ वर

31 May 2024 15:35:35
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी क्रमांक १ वर आला आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारी प्रसिद्ध करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर डीपीआयआयटीने ३० मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीचा तक्ता शेअर केला आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र २०२२-२३ मध्ये क्रमांक १ वर राहिल्यानंतर आता २०२३-२४ या आर्थिक वर्षांतसुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल ३० मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे.
 
 हे वाचलंत का? - मि
ळकतकर सवलत योजनेला मुदतवाढ द्या! आमदार महेश लांडगेंची मागणी
 
यानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १,१८,४२२ कोटी तर २०२३-२४ या आर्थिक वर्षांत १,२५,१०१ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक प्राप्त केली आहे. या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे.
 
 
महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदनही केले आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0