उत्तर मध्य मुंबईत तिरंगी लढत! एमआयएमनेही दिला उमेदवार

03 May 2024 16:46:31

Owaisi 
 
मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभेत आता एमआयएम पक्षानेही आपला उमेदवारी दिला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप, काँग्रेस आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. एमआयएमने शुक्रवारी रमजान चौधरी यांना उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर केली.
 
एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी रमजान चौधरी यांच्या उमेदवारीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, "आतापर्यंत आम्ही महाविकास आघाडीची अंतरात्मा जागी होईल आणि ४८ जागांपैकी एक जागा ते मुस्लीमांना देतील, याची वाट बघत होतो. परंतू, तसे न झाल्याने आम्ही उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला ४८ जागांपैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार दिसला नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  राहूल गांधी प्रवासी! देशात स्वागत होईल पण घर उभं राहणार नाही
 
ते पुढे म्हणाले की, "मला ही निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं होतं. परंतू, मी त्यांना सांगितलं की, मी देशभरात पक्षाचा प्रचार करेन. त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबईमध्ये रमजान चौधरी हे एमआयएमकडून निवडणूक लढवणार आहेत," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
दरम्यान, महायूतीकडून भाजपचे उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आले. त्यात आता एमआयएमनेही आपला उमेदवार घोषित केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0