शासनात काम करायचंय, माहिती व जनसंपर्क संचालनालयात इंटर्नशिपची संधी!

    29-May-2024
Total Views |
Directorate General of Information and Public Relations


मुंबई :      कुठल्याही शाखेतील पदवी शिक्षण घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी उपलब्ध झाली आहे. सदर इंटर्नशिपचा कालावधी तीन महिन्यांकरिता असणार आहे. इच्छुक उमेदवाराने या भरतीकरिता ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे.


कामाचे स्वरुप पुढीलप्रमाणे :-

शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


 

कामकाजाची वेळ -

सकाळी १० ते सायंकाळी ६


अर्ज करण्यासाठी पत्ता खालीलप्रमाणे :-

संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२.


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १५ जून २०२४ असेल.



विशेष टीप :

विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.