विरार-डहाणू रेल्वे सेवा ठप्प!

29 May 2024 16:24:27
Dahanu Virar Train

मुंबई :
स्टीलच्या कॉइल मुंबईकडे वाहून नेणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने विरार ते डहाणू लोकल सेवा ठप्प झाले आहे. तसेच मुंबईकडून गुजरात दिशेने जाणारी वाहतूक सुरु असून धीम्या गतीने या मार्गावरून गाड्या सोडल्या जात आहेत. तरीदेखील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर परिणाम मोठा परिणाम झाला. 

स्टील कॉइल वाहून नेणारी मालगाडी दि. २८ मे रोजी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गार्डच्या डब्यासह अखेरचे सहा डबे घसरले. मुंबईकडे ही मालगाडी घेऊन जात असताना ही घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून चौथ्या रुळावर क्रॉसिंग करत असताना अपघात घडला आहे. त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईन (स्लाइडिंग ट्रॅक) वर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे. त्याच बरोबरीने अप दिशेच्या विद्युत वाहिनी नादुरुस्त झाली असून पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. या अपघात कोणतीही जीवित हानी नसली तरी मालगाडीचे डबे रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वेची मुंबईकडील वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळेच दि. २९ मे रोजी २० तासाहून अधिक वेळ विरार ते डहाणू लोकल सेवा ठप्प होती. विरारवरून डहाणूला जाणाऱ्या अनेक लोकल ऐनवेळी रद्द करण्यात आले आहेत.

घसरलेली मालगाडी पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. मालगाडीचा अपघात इतका भीषण होता की, दोन क्रमांकाचा रेल्वे ट्रक पूर्णपणे उखडले गेले आहे. त्यामुळे सुरुवातीला ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात आली होती. पण १५ तासाहून अधिक वेळ हे काम करू आहे.
 

 
Powered By Sangraha 9.0