पालघरमध्ये रेल्वे रूळावरून घसरली, लोकल सेवा विस्कळीत!

28 May 2024 18:49:16
palghar train accident

मुंबई
: गुजरातमधून मुंबईच्या दिशेला येणारी एक रेल्वे रुळावरून घसरली आहे. ही घटना दि. २८ मे २०२४ रोजी दुपारी घडली. मालवाहतूक करणारी रेल्वे असल्याने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. ही मालवाहतूक रेल्वे पालघर स्थानकादरम्यान घडली. त्यामुळे बोईसरकडून विरार- चर्चगेटकडे येणाऱ्या लोकलवर ही याचा परिणाम झाला. तरी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वेचे डब्बे जे रुळावरून घसरले होते त्यांना उचलण्याचे काम करण्यात आले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ते ६ डब्बे रुळावरून घसरले होते. त्यात डब्बे पुर्णपणे पलटी झाल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या रेल्वे मार्गावरून जाणारी वाहतूक सेवा ठप्प झाली होती.

Powered By Sangraha 9.0