अदानी एंटरप्राईज १६५६०० कोटींचा निधी क्यूआयपीमार्फत उभा करणार

28 May 2024 14:52:05

Adani
 
मुंबई: अदानी समुहाच्या संचालक मंडळाने १६५६०० कोटी रुपये उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. हा निधी क्यूआयपी
(Qualified Institutional Placements) मार्फत ही निधी उभारणी केली जाणार आहे. इतर मार्गाने देखील निधी उभारणी होऊ शकते. २४ जूनच्या सर्वसाधारण सभेत (AGM) मध्ये याविषयी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
 
या बैठकीत लागणारी परवानगी, प्रकिया व इतर मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अजून निधी उभारण्याचे निश्चित करण्यात आलेले नाही. यापूर्वी मे २०२३ मधील बैठकीत क्यूआयपीमार्फत निधी उभारण्यासाठी परवानगी संचालक मंडळाने दिली होती मात्र त्यावेळी प्रस्ताव लांबणीवर गेला होता. हिंडनबर्ग प्रकरणानंतर झालेले शेअर बाजारातील नुकसान कंपनीने यापूर्वीच भरून काढलेले आहे. मार्च तिमाहीत कंपनीला ४५१ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.मागच्या वर्षांच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी नफा घटला होता.
 
निधी उभारणी परवानगी मिळाल्यानंतर अदानी एंटरप्राईज कंपनीने म्हटले आहे की, 'आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की संचालक मंडळाने १६६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नसल्या एकूण रकमेसाठी कंपनी आणि/किंवा इतर पात्र सिक्युरिटीजचे प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स जारी करून निधी उभारणीस मान्यता दिली आहे. हे QIP किंवा इतर अनुज्ञेय पद्धतींद्वारे एक किंवा अधिक टप्प्यांत साध्य केले जाईल,'
 
Powered By Sangraha 9.0