मुंबई वस्त्रोद्योग समितीमध्ये काम करायचंय?, भरतीअंतर्गत अर्ज मागविण्यास सुरूवात

27 May 2024 15:04:31
textiles committee mumbai recruitment
 

मुंबई :     मुंबई वस्त्रोद्योग समिती अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मुंबई वस्त्रोद्योग समितीकडून नवीन भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई वस्त्रोद्योग समितीमधील रिक्त जागांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई वस्त्रोद्योग समितीमध्ये होणाऱ्या भरतीसंदर्भात पदसंख्या, मुलाखतीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

सल्लागार (०१ जागा)
तांत्रिक अधिकारी (०३ जागा)


शैक्षणिक पात्रता -

बी.ई. / बी.टेक. टेक्स्टाईल किंवा बी. / B.F. टेक तसेच वस्त्रोद्योगातील ५ वर्षांचा अनुभव असावा.
तांत्रिक अधिकारी पदाकरिता बी.ई. / बी.टेक. टेक्स्टाईल किंवा बी. / B.F. टेक. तसेच २ वर्षांचा वस्त्रोद्योग आणि अध्यापनाचा अनुभव असावा.


वेतनमान -

सल्लागार पदाकरिता ६५ हजार रुपये वेतन मिळेल.
तांत्रिक अधिकारी पदाकरिता ४५ हजार रुपये वेतन मिळेल.


मुलाखतीचे ठिकाण -

वस्त्रोद्योग समिती, दुसरा मजला, पी. बाळू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.


मुलाखतीची तारीख आणि वेळ –

दि. ७ जून २०२४, सकाळी ११ ते दुपारी १:३० यावेळेत मुलाखती होतील
उमेदवाराने सकाळी १०:१५ मिनिटांपर्यंत किंवा त्या आधी उपस्थित राहणे बंधनकारक.


जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

मुंबई वस्त्रोद्योग समितीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

Powered By Sangraha 9.0