बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, २७६ जागांकरिता आजच अर्ज करा, जाणून घ्या तपशील!

27 May 2024 16:13:31
jammu and kashmir bank recruitment

 
मुंबई :     जम्मू आणि काश्मीर बँक अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. जेके बँकेमधील रिक्त जागांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत एकूण २७६ जागा भरल्या जाणार आहेत. त्याचबरोबर, अधिकृत अधिसूचनेनुसार अर्जप्रक्रिया दि. १४ मे पासून सुरू झाली असून दि. २८ मे २०२४ पर्यंत सुरू राहील. जेके बँकेच्या देशभरातील विविध शाखांमधील रिक्त पदे सदर भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहे.


पदाचे नाव -

शिकाऊ उमेदवार(अप्रेंटिसशीप)


शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक


वयोमर्यादा -

२० ते २८ वर्षे


वेतनमान -

१०,५०० रुपये


अर्ज शुल्क -

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ७०० रुपये
आरक्षित वर्गातील उमेदवारांकरिता ५०० रुपये


उमेदवारास अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे.
 
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २८ मे २०२४ असेल.

 
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

जम्मू आणि काश्मीर बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

Powered By Sangraha 9.0