ममतांच्या बंगालमध्ये हिंसाचार थांबेना! तृणमूलच्या गुंडांकडून भाजपच्या महिला कार्यकर्त्याची हत्या

23 May 2024 12:35:09
 BJP Worker
 
कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यापूर्वी पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) गुंडांवर महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नंदीग्रामच्या सोनचुरा गावात बुधवार, दि. २२ मे २०२४ ही घटना घडली. बुधवारी रात्री भाजप कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारासाठी जमले होते, त्यादरम्यान काही गुंडांनी मोटारसायकलवर येऊन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
 
हे वाचलंत का? -  बनावट मतदान करत होता, सनाउल्ला अन् त्याच्या तीन बायका; पोलिसांनी पकडताच कट्टरपंथीयांचा पोलिस स्टेशनवर हल्ला
 
दरम्यान, भाजपच्या महिला कार्यकर्त्या रथिबाला आदींवर गुंडांनी हल्ला केला, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलावरही गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. नंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या जखमी मुलाला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या हल्ल्यात भाजपचे एकूण सात कार्यकर्ते जखमी झाले असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) कार्यकर्त्यांवर या हल्ल्याचा आरोप केला आहे. टीएमसीने हे आरोप फेटाळले आहेत. ही भाजपच्या कार्यकर्त्यांमधील लढाई होती, असा दावा टीएमसीने केला आहे.
 
हे वाचलंत का? -  नोकरी देणाऱ्या विशालचाच 'सर तन से जुदा' करायला गेला मुख्तार सुलेमानी
 
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी बंगालमधील हिंसाचाराला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना जबाबदार धरले आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी बॅनर्जी यांच्यावर हिंसा भडकावल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, हे रानटी कृत्य टीएमसीने केले आहे कारण त्यांना माहित आहे की ते हरत आहेत.
 
अभिषेक बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथील सभेत सुवेंदू अधिकारी अनियमितता करून विजयी झाल्याचे सांगितले होते. २०२१ च्या निवडणुकीत काही लोकांना मतदान करू दिले नाही, आता त्यांनी सावध राहावे, असे ते म्हणाले होते. अभिषेक बॅनर्जी यांनीही महिनाभरात नंदीग्रामला परतणार असल्याचे सांगितले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0