मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बुद्धपौर्णिमा (Bangaladesh Buddhapornima) हा बौद्धांचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. त्यानिमित्ताने बुधवार, दि. २२ मे रोजी बांगलादेशात बुद्धपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बांगलादेश बौद्ध महासंघाने ढाका येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध मठात भगवान बुद्धांना आदरांजली वाहण्यासाठी प्रार्थना सभा आणि विविध चर्चासत्रे आयोजित केली होती.
हे वाचलंत का? : नागपुरात लव्ह जिहाद; पिडितेच्या कुटुंबीयांनी इरफानवर केला खुनाचा आरोप
यावेळी मठात मोठ्या संख्येने जमलेल्या बौद्ध भाविकांनी दीप प्रज्वलन करून भगवान गौतम बुद्धांकडे प्रार्थना केली. तसेच भगवान बुद्धांच्या प्रतिमेला फळे, फुले व मेणबत्त्या अर्पण केल्या. बांगलादेश बौद्ध सांस्कृतिक परिषदेने बुद्ध पौर्णिमेनिमित्त ढाका येथील राष्ट्रीय संग्रहालयासमोर शांती शोभा यात्रा काढली. कॉक्सबाजारमध्ये बुधवारी सकाळी बुद्धपौर्णिमा साजरी करण्यासाठी बुद्धभक्तांनी विविध बौद्ध विहार आणि बुद्धपल्लींमधून शांतता रॅली आणि मिरवणूक काढली.