'शिवचरित्र अभ्यासवर्ग कार्यशाळा' आपल्या नवी मुंबईत!

22 May 2024 15:20:57

Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
(Shivacharitra Abhasvarg Karyashala) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व शिवशंभु विचार मंच, कोंकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत 'शिवचरित्र अभ्यासवर्ग कार्यशाळा' आयोजित करण्यात आली आहे. रविवार, दि. २६ मे रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत रेड मॅजीक सभागृह, युरो स्कुल समोर, से-१९, ऐरोली याठिकाणी सदर कार्यशाळा संपन्न होईल.

हे वाचलंत का? : पोखर्णीत 'नृसिंह जन्मोत्सवा'ची' रंगत; भाविकांची मोठी गर्दी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र अभ्यासक दृष्टीने पाहण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल या भागातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, मंडळ/संस्था प्रतिनिधी, इतिहास अभ्यासक इतर नागरिक यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यशाळेचे प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांसाठी १०० रु. व इतरांसाठी २०० रु. आहे. https://forms.gle/uMRxphCSmRJvPFfC8 या लिंकवर आपण आपले नोंदणी अर्ज भरू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : पंकज भोसले : ९८२१००९१३७

Powered By Sangraha 9.0