नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ३१ मे पर्यंत वाढ केली आहे.आरोपी मनीष सिसोदिया हे तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर झाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ मे रोजी राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात होणार आहे. अत्यावश्यक नसलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी किती वेळ लागेल हे लिखित स्वरूपात सांगण्यास न्यायालयाने आरोपींना सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मनीष सिसोदिया यांनी प्रचारासाठी जामीन मागितला होता. लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील मतदान संपले असून २५ मे रोजी दिल्लीतील सातही जागांवर मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत सिसोदिया यांनी निवडणूक प्रचारासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.