फसवणूक रोखण्यासाठी बीएसईने 'ही' अधिसूचना जारी केली

21 May 2024 18:59:46

bse caution
 
 
मुंबई: बीएसईने (BSE) ने एक अधिसूचना जाहीर केली आहे ज्यामध्ये बीएसईचा आधार देत काही ट्रेडर व्हॉट्सॲपवर ग्रुप बनवून ग्राहकांची दिशाभूल करत आहेत. तरी बीएसईकडून अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्या मध्ये ' इंडियन स्टॉक मार्केट ट्रेडिंग ' या ग्रुपवरून ग्राहकांना बीएसईवरील दरापेक्षा स्वस्त दरात समभाग (stocks) मिळू शकतात तसेच Block Trading 10 X return investment plan या आशयाखाली फसवणूक करत आहेत.
 
 bse caution
 
तरी बीएसईकडून सावधानतेचा इशारा दिला जात आहे. बीएसईंने सांगितल्याप्रमाणे, गुंतवणूकदारांना अशा कुठल्याही व्हॉट्सॲपवर ग्रुपचा हिस्सा न बनण्यासाठी आवाहन केले गेले आहे. तसेच या भूलथापांना बळी पडतानाच अशा योजनेचे सदस्य बनणे ही कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तो दंडनीय गुन्हा असल्याचे बीएसईने म्हटले आहे. तसेच आपल्या निवेदनात बीएसईंने म्हटले आहे की, कुठलाही प्रकारची आपली वैयक्तिक माहिती अथवा बँक खाते क्रमांक, इतर खाजगी माहिती अशा प्रवृत्तीच्या लोकांना न देण्याचे आवाहन केले गेले आहे.बीएसई अशा कुठल्याही प्रकारची सवलत,ऑफर,ग्रुप स्किम आणत नाही त्यामुळे सोशल मीडियावर आणि इतर व्यासपीठावर अशा योजनेचा हिस्सा न बनण्याचे आवाहन बीएसईने केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0