हिंदुस्थानात होळकरशाहीची मजबूत पायहारणी करणारे सुभेदार

20 May 2024 18:00:57

malharrao holkar 
 
मल्हारराव होळकरांचे विशेष काय माहितीय? ज्या काळात स्त्रीला उंबऱ्याच्या आत सुद्धा पदर ओढून राहावे लागे त्या काळात त्यांनी आपल्या मुलापेक्षा सुनेवर विश्वास ठेऊन हिंदुस्थानचे राज्य तिच्या ओटीत घातले. धनगर समाजातील मल्हारराव बाजीरावांपासून पेशवे राजकारणात सक्रिय असल्याचे दिसतात. बाजीरावांचे ते मित्र होते असे म्हंटले तरी चालेल. शिंदे आणि होळकर या दोन मैतरांच्या जोरावर तर त्यांनी हिंदुस्थानभर उड्या घेतल्या. या मल्हाररावांचे आज पुण्यस्मरण. त्यानिमित्त त्यांच्या कारभारातील कर्तृत्वाबद्दल मी सांगणारे.
 
मल्हार रावांकडे इच्छाशक्ती दुर्दम्य होती. घोड्यांच्या पागा करताना त्यांना स्वप्न पडायची ती रणांगणावर जायची. त्याचवेळी पुण्यात बाजीराव शाहू छत्रपतींना भेटून पेशवाईची वस्त्रे मिळवून आले होते. बाजीरावांची नजरही तयार. माणसे ओळखण्यात ते पारंगत. शिंदे आणि पवार हिंदुस्थानावर होतेच. त्यात होळकर नवे. पवारांचे अस्तित्व लयास जाण्यास सुरुवात झालेली. अशात हिंदुस्थानात तिसरा वाटेकरी कुणास हवा असेल? शिंदे महत्वाकांक्षी पण तेवढेच धुरंदर. मल्हाररावांशी उघड विवरोध त्यांनी हयातीत केव्हाच पुकारला नाही. उलट गरजेला निकडीला मराठ्यांच्या राज्यासाठी मदतीलाच धावून आले. मल्हाररावांनी बाजीरावांचे अनुकरण करत आपले एक स्थान पुण्यापासून दूर हिंदुस्थानात स्थापन केले. जेजुरीला त्यांचा वाडा. पुण्यास जाताना एका शिवमंदिरात एक लहान मुलगी महादेवाला दिवाबत्ती करण्यासाठी आली. एवढ्या मातबर माणसांसमोर ती जराही बुजली नाही.
 
मल्हारराव पाहतच राहिले. स्त्रियांमध्ये गुण असत मात्र ते घारीसारख्या तीक्ष्ण नजरेस पडायचेच नाहीत. मल्हाररावांनि मात्र स्त्रीपुरुष समानतेचा चस्मा लावला नव्हता. मुलगी मनात भरताक्षणीच त्यांनी तिथल्या पाटलांशी बोलणी केली. घरात सून आली. मल्हारराव सतत मोहिमेवर असत. इतर व्यवहार पाहण्यासाठी अहिल्याबाई होत्याच पण त्यांना कारभारासाठी तयार करताना ते कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायचे हे पात्रात वाचले की समजते ती त्यांची दूरदृष्टी. आपल्या पुत्राच्या निधनानंतर अहिल्या बाई आपल्या सवतीसोबत सती जाण्याची तयारी करत होत्या. तू माझ्या मुलासारखीच असे म्हणताना मल्हाररावांनी आहीलेच्या पाय पडल्या. मुक्ता मालोजीं लहान होते. अहिल्याबाईंनी सासर्यांचे मन राखले. त्या दोघांमध्ये तिहेरी नाते होते. गुरु शिष्य, सून सासरा आणि स्वामी असे. मोहिमेवर असताना त्यांनी कधीच तिजोरीतून ऐवजाची मागणी केली नाही. उलट आपला खर्च मोहिमेवरच भागवून हरी दौलत पाठवत झाले.
 
होळकरशाही सर्वात श्रीमंत राज्य झाले ते याचमुळे. मल्हाररावांच्या पश्चात महेश्वरास जाऊन वस्त्रोद्योग आदी उद्योगधंदे सुरु केले, दान धर्म आणि मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला त्या सर्वांसाठी पैसा उभा कसा करावा व कसा खर्च करावा याविषयी त्यांनी सतत अहिल्याबाईंना सूचना दिल्या आहेत. माणसे कशी जपावी हे सांगताना दूरचे होळकर तुकोजी यांच्या घराची चौकशी करावयाचे अहिल्येस पात्रातून सांगत असत. पुण्यात पेशवे अनेक आघाड्यांवर लक्ष देत असताना सवाई माधवरावांच्या कारकीर्दीपर्यंत दिल्लीपर्यंतचा हिंदूस्थान राखला तो होळकरांनीच. अहिल्याबाईंनी खरेतर, पण त्यासाठी त्यांना बळ प्रदान करणारे हे पित्यासमान मल्हाररावच.
Powered By Sangraha 9.0