खतरनाक ! नियामक मंडळानी १.८ दशलक्ष सिमकार्ड ब्लॉक केली सायबर गुन्हेगारावर मोठी कारवाई!

20 May 2024 14:27:48

simcard
 
 
 
मुंबई: खतरनाक ! सायबर क्राईम व टेलिकॉम क्षेत्रातील ऑनलाईन घोटाळे, अथवा गैरवापर रोखण्यासाठी टेलिकॉम बँक ऑपरेटरने १.८ दशलक्ष सिमकार्ड ब्लॉक करण्याचे ठरवले आहे. तसा रिपोर्ट प्रसारमाध्यमांनी दिला असून घोटाळेबाजांसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. यावर नियामक मंडळाने कडक कारवाई करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नियामक मंडळांनी या सिमकार्डवर लक्ष ठेवले होते.
 
अखेर सरकारच्या रडारवर असलेल्या या सिमकार्डवर सरकारने कारवाई केली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकाऱ्यानी म्हटले आहे की, 'चौकशीदरम्यान एक गोष्ट लक्षात आली आहे की, हजारो सिमकार्ड एका हँडसेटसह वापरण्यात आली होती.'
 
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने टेलिकॉम कंपन्यांना २८२२० मोबाईल हँडसेट डिस्कनेक्ट करण्यासाठी आदेश दिले आहेत. याशिवाय अनेक मोबाईल कनेक्शन चौकशीसाठी नियंत्रित करु शकतात. गेल्या काही वर्षांत सायबर क्राईम गुन्हेगारीत मोठी वाढ झाली होती.
 
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग (NCRP) मधील आकडेवारीनुसार, १०३१९ कोटी रूपयांचे नुकसान ग्राहकांना आतापर्यंत झालेले आहे.२०२३ मध्ये ६९४००० सायबर क्राईम व आर्थिक गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल झाल्या असल्याचे पार्लमेंट स्टँडिंग कमिटीने यापूर्वी म्हटले होते.
 
चौकशी अधिकारी यांनी म्हटल्याप्रमाणे, अनेकदा गुन्हेगार विविध सिम कार्ड व मोबाईल हँडसेटची अदलाबदली करून नियामक मंडळ व टेलिकॉम कंपन्यांच्या नजर चुकवण्यासाठी प्रयत्न अथवा हातखंडे वापरतात. यापूर्वी सायबर क्राईममध्ये २००००० सिमकार्ड जप्त करण्यात आली होती. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आगामी काळात सावध राहण्याची व नवीन उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
 
Powered By Sangraha 9.0