महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात मतदान! पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन

20 May 2024 13:33:26

Modi 
 
मुंबई : राज्यात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करा असे ते म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत मतदानाचे आवाहन केले.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "२०२४ लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांसाठी मतदान होत आहे. ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे मी आवाहन करतो," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मतदानावेळीच उबाठा गटाचे दोघं ताब्यात!
 
सोमवार, २० मे रोजी लोकसभेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व दिग्गज नेते आणि कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अशातच पंतप्रधान मोदींनीही जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0