मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजतापासून सूरु झाले आहे. पाचव्या टप्प्यात एकूण १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. दरम्यान, या मतदारसंघांत सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे - ६.९२ टक्के
दिंडोरी - ६.४० टक्के
नाशिक - ६.४५ टक्के
पालघर - ७.९५ टक्के
भिवंडी - ४.८६ टक्के
कल्याण - ५.३९ टक्के
ठाणे - ५.६७ टक्के
मुंबई उत्तर - ६.१९ टक्के
मुंबई उत्तर-पश्चिम - ६.८७ टक्के
मुंबई उत्तर-पूर्व - ६.८३ टक्के
मुंबई उत्तर-मध्य - ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण-मध्य - ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण - ५.३४ टक्के